बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील सहा गावातील गावकऱ्यांच्या केसाची जलद गतीने गळती होऊन टक्कल पडत आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकांचे केस गळण्यामागील नेमके कारण काय आहे? हे शोधण्यासाठी गावातील पाण्याचे नमुने संकलित करुन तपासण्यासाठी पाठवण्यात आले. आता या पाण्याचा अहवार प्राप्त झाला आहे. याबाबत बुलढाणा येथील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.