Devendra Fadnavis: “राज ठाकरे की उद्धव ठाकरे?”, असा प्रश्न नुकत्याच एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “राजकारणात काहीही पक्क नसतं. आधी उद्धव ठाकरे मित्र होते. मग राज ठाकरे मित्र झाले. आता राज ठाकरे मित्र आहेत आणि उद्धव ठाकरे शत्रू नाहीत.” देवेंद्र फडणवीस यांच्या या उत्तरावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर आता संजय राऊतांच्या प्रतिक्रियावर देवेंद्र फडणवीस टीका केली.