Dharavi Bomb Blast Threat: धारावीत बॉम्ब असल्याचा निनावी दूरध्वनी मुंबई पोलिसांना आला आहे. धारावीच्या राजीव गांधी नगरमध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी दूरध्वनी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला गुरूवारी प्राप्त झाला होता. त्यानंतर तातडीने याबाबतची माहिती स्थानिक पोलीस, गुन्हे शाखा यांना देण्यात आली. त्यांनी सर्व परिसरात तपासणी केली. त्यावेळी माहितीमध्ये तथ्य नसल्याचे निष्पन्न झाले. अखेर आरोपीविरोधात शनिवारी धारावी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता ३५३(१), ३५३(३) गुन्हा दाखल केला. शांतता भंग करण्यासाठी खोटी माहिती दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून धारावी पोलीस अधिक तपास करत आहेत.