Kareena Kapoor Khan : अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या वांद्रे (पश्चिम) येथील घरात शिरलेल्या दरोडेखोराने हल्ला केला. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला. सैफच्या मानेवर व पाठीवर आणि हातावर जखमा झाल्या. हल्लेखोराने केलेल्या हल्ल्यात चाकूचे एक टोक सैफच्या शरीरात घुसलं होतं ते लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून काढलं. या प्रकरणातील आरोपीला रविवारी अटक करण्यात आली आहे. सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर करीनाने निवेदन दिलं होतं, त्यानंतर आता तिने एक पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.