Saif Ali Khan Meets Auto Driver Bhajan Singh: डिस्चार्ज मिळण्यापूर्वी सैफने त्याला रुग्णालयात दाखल करणाऱ्या भजन सिंग राणा या रिक्षा चालकाची भेट घेत त्याला मिठी मारली. यावेळी सैफने रुग्णालयात दाखल केल्याबद्दल भजन सिंग यांचे आभार मानले. यावेळी सैफच्या आई शर्मिला टागोर याही उपस्थित होत्या. त्यांनीही यावेळी भजन सिंग यांचे आभार मानले. अभिनेता सैफ अली खानवर १६ जानेवारी रोजी त्याच्या राहत्या घरात चाकू हल्ला झाला होता. त्यानंतर सैफवर लीलावती रुग्णालयात तब्बल पाच दिवस उपचार सुरू होते. उपचारानंतर काल सैफला काल रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला.