Walmik Karad: खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडची तब्येत बिघडली आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.”पोटदुखीचा त्रास होत असल्याने वाल्मिक कराडला रात्री साडेबारा वाजता जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, सध्या याच ठिकाणी उपचार सुरू आहेत”, अशी माहिती डॉ.एस.बी.राऊत यांनी दिली आहे.