राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या विधाना प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. याबाबत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर अमितेश कुमार म्हणाले, “राहुल सोलापूरकर यांनी विधान केलेल्या दोन्ही व्हिडिओ क्लिप पोलिसानी तपासले आहेत.त्यामध्ये गुन्हा दाखल करावा असे आक्षेपार्ह काहीही आढळून आले नाही.राहुल सोलापुकार यांनी आमच्याकडे सविस्तर खुलासा पाठवला असून त्याचे अवलोकन करण्यात आले आहे.त्यामुळे राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात अद्यापपर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.”