न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक ज्या प्रकारे लुटली गेली त्यामध्ये सर्व भाजपाचे लोक आहेत, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यावर आता किरीट सोमय्या का पत्रकार परिषद घेत नाहीत? असा प्रश्नही त्यांनी केला. दरम्यान, बहुराज्य सहकारी बँकेचा दर्जा मिळविलेल्या न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने गुरुवारी निर्बंध लादण्यासह, शुक्रवारी तिचे संचालक मंडळ बरखास्त करणारी कारवाई केली. ढिसाळ कारभारामुळे मध्यवर्ती बँकेने नवीन कर्जवाटपासह सहा महिन्यांसाठी ठेवी काढण्यावर बंदी घालण्याचा आदेश बँकेवर गुरुवारी काढला.