शक्तिपीठ महामार्गाविरोधात बुधवारी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन झालं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार जयंत पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी “माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही. माझ्याबद्दल शंका असल्याने तुम्हाला हमी देणं जरा धोक्याचं आहे, असं विधान त्यांनी केलं.