Kunal Kamra Controversy: स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा हा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.कुणालने एका गाण्याच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. ज्या ठिकाणी कुणाल कामराचा कार्यक्रम पार पडला, जिथे त्याने गाणं सादर केलं त्या मुंबईमधील खार येथील युनिकॉन्टिनेन्टल हॉटेलमध्ये जाऊन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. अशातच आता सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी कुणालने गायलेले गाणं गात शिंदे गटावर टीका केली.