Thane Karnataka Bank Marathi MNS: मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळलेला असूनही महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मराठी भाषेचा वापर होताना मात्र दिसून येत नसल्याने गुढीपाडव्याला मनसेच्या सभेतून राज ठाकरे यांनी मनसैनिकांना आवाहन करत ज्या ठिकाणी मराठीचा वापर होत नसेल त्याठिकाणी जाऊन समज देण्याचे आदेश दिल्यानंतर महाराष्ट्रात मनसैनिक मराठी भाषेच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. ठाण्यात कर्नाटक बँकेत मनसैनिक घुसत बँकेत मराठी फलक नसल्याने चांगलेच आक्रमक झालेत. ५ दिवसात यात बदल नाही झाला तर मनसे स्टाईल दणका देऊ असा थेट इशारा बँकेच्या अधिकाऱ्यांना मनसैनिकांनी दिला आहे.