नवी मुंबई मनपा रुग्णालयात ३२ वर्षीय संगीता खरात यांचा प्रसूतीनंतर झाला मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रसूती नंतर रक्त तपासण्यासाठी रक्त काढण्याचा प्रयत्न केला असता शरीरात रक्तच नसल्याचं समोर आलं. रक्तस्त्राव होत आहे याकडे दुर्लक्ष झाल्याने महिला अस्वस्थ झाली. त्यानंतर मनपा रुग्णालयाच्या कोट्यातून महिलेला फोर्टिस रुग्णालयात भरती करण्यात आलं. मात्र, महिलेचा ब्रेन हॅमरेजने महिलेचा मृत्यू झाल्याचं डाॅक्टरांनी कळवलं. दरम्यान, महिलेचा मृत्यू झाला असताना आणि पालिका कोट्यातून महिलेला फोर्टिस रुग्णालयात भरती करण्यात आले असताना देखील अपुरे कागदपत्र असल्याचं कारण देत रुग्णाच्या नातेवाईकांकडून बिलाची रक्कम मागण्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे.