केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे कायमच नवनव्या संकल्पना राबवत असतात. आता गाडीतील हाॅर्नच्या जागी चक्क भारतीय संगीत ऐकू येणार, असं गडकरींनी सांगितलं आहे. दिल्लीत एका कार्यक्रमात ते बोलत होते. हाॅर्नच्या कर्कश आवाजाचा अनेकदा त्रास होतो. त्यामुळे आता संगीत वाद्यांचा आवाज ऐकू येईल. त्यासाठी कायदाही केला जाणार असल्यांच गडकरी म्हणाले.