Pahalgam Terror Attack जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्याची घटना मंगळवारी घडली. यामध्ये आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे. लोकांना धर्म विचारुन त्यांना ठार करण्यात आल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली. याच या हल्ल्याचे विविध फोटो आणि व्हिडीओ समोर येत आहेत. या हल्ल्यात कानपूरच्या शुभम द्विवेदी याचा अंत झाला आहे. लग्नांनंतर अवघ्या २ महिन्यात शुभम आणि ईशान्येचा संसार उद्ध्वस्त करणाऱ्या या हल्ल्याच्या वेळी काय घडलं हे स्वतः ईशान्या आणि शुभम यांच्या भावांनी सांगितलं आहे.