मराठी बिग बाॅस फेम सूरज चव्हाणचा झापुक झुपूक हा सिनेमा नुकतचा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून त्याची बरीच चर्चा रंगली होती. ट्रेलरला आल्यानंतर अनेकांनी त्यांवर टीकाही केली होती. मात्र सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सूरजचा चाहता वर्ग सिनेमा पाहण्यासाठी गर्दी करेल अशी अपेक्षा होती. मात्र चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद मिळालेला दिसत नाही. या पार्श्वभूमीवर अभिनेते पंढरीनाथ कांबळे यांनी सूरजला व्हिडीओ काॅल करत त्याला आधार देण्याचा प्रयत्न केला. तसंच ही वेळही निघून जाईल, असं म्हणत सूरजला प्रोत्साहन दिलं.