Caste Census India in Upcoming Population Census : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार जातीनिहाय जनगणना करणार आहे. आज (३० एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या कॅबिनेट बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे. कॅबिनेट बैठकीनंतर वैष्णव यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. मात्र केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेचा मास्टरस्ट्रोक आताच लगावण्याचं कारण काय? ही मागणी करणाऱ्या राहुल गांधींची जातीनिहाय जनगणनेवर काय प्रतिक्रिया आहे? याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया