Karnala Panvel Accident: रविवारी उशिरा रात्री कर्नाळा खिंडीत खाजगी प्रवासी बस पलटल्याची गंभीर घटना घडली. ओमकार ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये एकूण 49 प्रवासी होते. या अपघातात 26 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर आहे. अमोल तळवडकर या प्रवाशाचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही खासगी बस मुंबईहून कोकण (रत्नागिरी/सिंधुदुर्ग)कडे निघाली होती. रात्री सुमारे 11 वाजता कर्नाळा घाट उतरत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला उलटली. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.