अजित पवारांनी मविआमध्ये यावं त्यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण होईल, असं विधान ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केल्यानंतर अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत आपल्याला याविषयी माहित नसल्याचं म्हटलं आहे. हा विषय शरद पवारांचा आहे असंही ते म्हणाले.