India Pakistan War Tensions Operation Sindoor : भारतीय सशस्त्र दलांनी बुधवारी रात्री उशिरा पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले केले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने केलेल्या या हवाई हल्ल्यानंतर, पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पुण्याच्या संतोष जगदाळे यांच्या पत्नी व लेकीने , शुभम द्विवेदीच्या पत्नीने, तसेच कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नी व मुलाने समाधान व्यक्त केले आहे.