Eknath Shinde: ऑपरेशन सिंदूर यशस्वी करत भारतीय लष्कराने पाकपुरस्कृत दहशतवादाचे कंबरडे मोडले. यानंतर खवळलेल्या पाकिस्तानने गुरूवारी रात्री जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानच्या सीमावर्ती भागात ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय लष्कराने त्यालाही चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानी ड्रोन, क्षेपणास्त्र हाणून पाडले. या घडामोडीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नागपूर येथे माध्यमांशी बोलत असताना शिंदे यांनी पाकिस्तानची लायकी काढली. तसेच भारतावर हल्ला करण्याची त्यांची औकात नाही, असे म्हटले.