Operation Sindoor Bramhos Used, UP CM Yogi Adityanath Confirms: पाकिस्तानसोबत वाढत्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी लखनौमधील उत्तर प्रदेश संरक्षण औद्योगिक कॉरिडॉर येथे ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र उत्पादन युनिटचे व्हर्च्युअल उद्घाटन केले. ही सुविधा दरवर्षी ८० ते १०० क्षेपणास्त्रे तयार करण्यासाठी डिझाइन केलेली आहे. याच प्रसंगी बोलत असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाकिस्तानला ब्रम्होसची ताकद विचारा असं विधान करत ऑपरेशन सिंदूरमध्ये झालेल्या वापराबाबत ठोस विधान केलं आहे.