Ranveer Allahbadia Post on Pakistan: प्रसिद्ध यूट्यूबर व पॉडकास्टर रणवीर अलाहाबादिया त्याने पाकिस्तानसंदर्भात केलेल्या पोस्टमुळे चर्चेत आहे. ‘इंडियाज गॉट लेटेंट’ वादामुळे चर्चेत राहिल्या रणवीरने पाकिस्तानी लोकांची माफी मागितली आहे. त्याची पोस्ट पाहता तो पुन्हा एकदा वादात अडकेल, असं त्याने स्वतः सुद्धा त्याच्या पोस्ट मध्ये म्हटलंय. कारण रणवीरने फक्त पाकिस्तानी लोकांची माफीच मागितली नाही तर त्याच्या या पोस्टमुळे भारतीय लोक नाराजही होतील, असं म्हटलं आहे.त्याची ही पोस्ट व्हायरल झाल्यावर लोकांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली, मग त्याने ती पोस्ट डिलीट केली, पण आता त्याच्या पोस्टचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रणवीरने पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलं होतं, ते जाणून घेऊयात.