ऑपरेशन सिंदूरची कारवाई झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (१२ मे) देशाशी संवाद साधला. पाकिस्तान विरोधातल्या ऑपरेशन सिंदूरला स्थगिती दिली आहे. ते संपलेलं नाही पाकिस्तानवर आमची नजर आहे. जर पाकिस्तानने आगळीक केली तर असंच उत्तर देण्यात येईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं. तसंच पाकिस्तानला तीन कठोर इशारे दिले आहेत.