भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या मध्यस्थीवरून खासदार संजय राऊतांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. केवळ पक्ष फोडणं आणि पक्ष विकत घेणं एवढीच यांची लायकी आहे. पाकिस्तानला तोडण्याची यांच्यात हिंमत नाही, असं संजय राऊत म्हणाले.