कल्याण पूर्वेच्या हद्दीत असणाऱ्या एका खासगी शाळेतील संचालक हे विद्यार्थ्यांच्या समोरच शाळेच्या प्रांगणात अश्लील कृत्य करत असल्याचा दावा करत शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी पोलीस स्थानक गाठलं आहे. यापूर्वी सुद्धा अशा प्रकारच्या तक्रारी येत होत्या असं म्हणत शिवसेनेचे नेते महेश गायकवाड जे या शाळेच्या संचालक सदस्यांपैकी एक आहेत त्यांनी सुद्धा या प्रकरणाची पुष्टी केली. शाळेतील अन्य विद्यार्थ्यांवर सुद्धा अश्लील व्हिडिओत दिसणाऱ्या इसमाची वाईट नजर असते असं म्हणत ठाकरे गटाच्या पदाधिकारी आशा रसाळ यांनी या प्रकरणाची माहिती दिली आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी शिक्षिका ही सुद्धा शाळेतील संचालक असून चव्हाण नामक इसमासह तिला अनेकदा आक्षेपार्ह कृत्य करताना पाहिल्याचं तक्रारदार पालकांनी म्हटलं आहे. या प्रकरणात पालकांनी व ठाकरे गटाने मांडलेली बाजू इथे पाहूया.