Vaishnavi Hagwane Suicide or Murder Case: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या सुनेच्या आत्महत्येप्रकरणी शवविच्छेदन अहवाल समोर आला असून यात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यापूर्वी बावधन पोलिसांनी या प्रकरणामध्ये शशांक राजेंद्र हगवणे, लता राजेंद्र हगवणे आणि नणंद करिष्मा राजेंद्र हगवणे यांना बेड्या ठोकल्या आहेत. अद्यापही सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील राजेंद्र हगवणे हे फरार आहेत. या प्रकरणामध्ये बावधन पोलिसांवर मोठा राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.