Devendra Fadnavis: सुशील आणि राजेंद्र हगवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. यावर वैष्णवीच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “पोलिसांनी राजेंद्र आणि सुशील हगवणेंना अटक केली, ती योग्यच कारवाई केली आहे. आता मकोका कायद्याच्या अंतर्गत कारवाई केली पाहिजे. कारण त्यांनी आमच्या मुलीचा अमानुष छळ केला आहे. तिला मारहाण केली, त्यामुळे मकोका कायद्याच्या अंतर्गतच या सगळ्यांवर कारवाई केली गेली पाहिजे.”, अशातच वैष्णवीच्या वडिलांच्या या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.