Vaishnavi Hagwane Case: पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथील वैष्णवी हगवणे यांनी सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली.या घटनेनंतर अनेक धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहे.त्याच दरम्यान पुण्यातील मराठा समजातील विविध राजकीय संघटनांच्या प्रतिनिधीची आगामी काळात लग्न सोहळा कशा प्रकारे केले जावे,किती खर्च करावा, याबाबत बैठक घेण्यात आली.