वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपींना काल २८ मे ला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयात वैष्णवीचा नवरा शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा यांना एका दिवसाची पोलीस कोठडी, तर वैष्णवीचे सासरे राजेंद्र आणि दीर सुशील यांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयात हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी वैष्णवीवर अनेक दावे करत युक्तिवाद केला, त्यानंतर त्यांने केलेल्या दाव्यावर वकिलांवर प्रतिक्रिया येत आहे, दरम्यान अंजली दमानिया यांनी वकील विपुल दुशिंग यांच्यावर टीका करत अख्खी कुंडली वाचली