Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात यांनी आमदार सत्यजित तांबे यांना चांगलंच सुनावलं आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत बोलताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली होती. यावरून महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी देखील सत्यजित तांबे यांना प्रत्युत्तर दिलं होतं.दरम्यान, त्यानंतर आता बाळासाहेब थोरात यांनी आमदार सत्यजित तांबे यांनी राहुल गांधींबाबत केलेल्या विधानावरून त्यांना चांगलंच सुनावलं आहे. सत्यजित तांबे यांचं बोलणं बालिशपणाचं असल्याचं थोरातांनी म्हटलं आहे.