महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीवर लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी लेख लिहून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये वाढले नाहीत तेवढे मतदार निवडणुकीच्या काळात वाढले असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “रोज खोटं बोललं की लोकांना खरं वाटतं असं राहुल गांधींना वाटत असल्याने त्याच त्या गोष्टी ते सातत्याने बोलतात”, असं ते म्हणाले.