मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या अपघाताबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली. मुंबई लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते. ही घटना दुर्दैवी आहे. मी पण रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी बोलणार आहे. नेमक्या काय उपाययोजना केल्यावर लोकलने प्रवास करणाऱ्यांचा जीव सुरक्षित राहील यासाठी पावलं उचलाविच लागणार आहेत, असं अजित पवार म्हणाले.