Vatsavitri Pujan At येवला शहरातील स्मशानभूमी येथे वटसावित्री पौर्णिमेनिमित्त विधवा महिलांचा सन्मान करत तसेच संगीत खुर्ची, उखाणे स्पर्धा, सांस्कृतिक नृत्य यासह विविध स्पर्धेचे आयोजन करत यावेळी येवला शहरातील अमरधाम येथे वटसावित्री पौर्णिमा मोठ्या उत्साहात महिलांनी साजरी केली. यावेळी विधवा महिलांना साडी देऊन सन्मानित करण्यात आले. आगळा वेगळा उपक्रम यावेळी येवला शहरातील शिवभक्त महिलांनी अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरा परिसरात साजरा केला.