डबल महाराष्ट्र केसरी असलेले चंद्रहार पाटील यांनी सोमवारी (९ जून) शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. हे तेच चंद्रहार पाटील आहेत ज्यांच्यासाठी ठाकरे गटाने काँग्रेसची नाराजी पत्करून सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीचं तिकिट दिलं होतं. त्याच चंद्रहार पाटलांनी आता शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे या सर्व राजकीय घडामोडींचं येत्या काळात काय पडसाद उमटू शकतात? सांगलीमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटात ताणले गेलेले संबंध अजून ताणू शकतात का? याबद्दल लोकसत्ताचे राजकीय संपादक संतोष प्रधान यांनी सविस्तर भाष्य केलं आहे.