Marathi Vs Hindi Dispute In State Bank Of India Branch In Dhule: धुळ्यातील प्रमोद नगर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया मधील परप्रांतीय अधिकाऱ्याने महिलेशी हुज्जत घालत मराठी भाषेचा देखील अपमान केला. याबाबतची माहिती महिलेने ठाकरे यांच्या शिवसेनेकांना दिली. त्यानंतर ठाकरेंच्या शिवसैनिकांनी बँक गाठली. संबंधित परप्रांतीय अधिकारी यावेळी बँकेत मिळून आला नाही मात्र या अधिकाऱ्याची बाजू घेणाऱ्या कर्मचाऱ्याला ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी थेट कानशिलात लगावली आहे. या प्रकारामुळे बँकेत चांगलाच गोंधळ उडाला होता.