त्रिभाषा सूत्राला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच मंजुरी दिली गेली होती, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. सोमवारपासून महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन सुरू होत असून त्याआधी रविवारी महायुती सरकारची पत्रकार परिषद संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.