Sanjay Raut: राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती करु नये अशी मागणी विरोधकांकडून गेल्या काही दिवसांपासून होत होती. राज्य सरकारने हिंदी भाषा सक्तीचा निर्णय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रद्द केला. या पार्श्वभूमीवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “राज्य सरकारने हिंदी भाषा सक्तीचा निर्णयावरून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जनता रस्त्यावर उतरली, राज्यातील अनेक पक्ष रस्त्यावर उतरले आणि त्या आदेशाची होळी केली. तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित मोर्चाचा सरकारने धसका घेतला होता आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला हिंदी भाषा सक्तीचा निर्णय आदेश रद्द करावा लागला”