Teen Girl Assaulted in Daund: पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून पंढरपूरला देवर्शनासाठी निघालेल्या आणि चहा पिण्यासाठी थांबलेल्या कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांपैकी एकाने अल्पवयीन मुलीच्या गळ्याला कोयता लावून तिच्यावर बलात्कार केला. तसंच इतर महिलांच्या गळ्यातील दीड लाखांच्या आसपास सोन्या चांदीचे दागिने लुटून दरोडेखोर पसार झाल्याची ही घटना आहे.