त्रिभाषा सूत्राचा जीआर सरकारने रद्द केल्यानंतर आता ठाकरे गट, मनसे आणि इतर संघटना मिळून विजयी मेळावा आयोजित करणार आहेत. ५ जुलैला हा मेळावा होणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती देत मेळावा कुठे आणि किती वाजता होईल याची माहिती दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टोला लगावला.