काँग्रेस नेते नाना पटोले हे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सभागृहात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी ते थेट अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आसनाजवळही गेले. या कृतीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोलेंनी अध्यक्षांची माफी मागावी अशी मागणी केली. तर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिवसभरासाठी नाना पटोले यांचं निलंबन केलं.