काँग्रेस नेते नाना पटोले यांनी शेतकऱ्यांविषयी बोलताना पंतप्रधान मोदींचा एकेरी उल्लेख केला. त्यावरून सभागृहात एकच गोंधळ झाला. नाना पटोलेंचं एक दिवसासाठी निलंबनही करण्यात आलं. या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाप बापही होता है असं म्हणत नाना पटोलेंना उत्तर दिलं आहे.