Sanjay Raut: “आता महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत,जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत आता महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचा कट सुरु झाला आहे. अशी भाषणं आता ऐकायला मिळणार आहेत. तुमच्यातही ही ताकद नाही आणि कुणाच्या बापामध्ये ही ताकद नाही की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकाल”,असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. आता फडणवीसांच्या या टीकेला खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.