Train Passenger Beaten By Pantry Workers In Running Train: नवी दिल्लीहून चेन्नईला ग्वाल्हेरमार्गे जाणाऱ्या ग्रँड ट्रंक एक्सप्रेसमध्ये (ट्रेन क्रमांक १२६१६) एका प्रवाशाला पॅन्ट्रीच्या कर्मचाऱ्यांकडून मारहाण झाल्याचे सांगणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. प्रसिद्ध ट्रॅव्हल ब्लॉगर सरफराज झैन याने पाण्याच्या बाटलीसाठी जास्त भाडे आकारल्याबद्दल तक्रार केल्यानंतर पेंट्री कर्मचाऱ्यांवर त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. झैनच्या म्हणण्यानुसार, भांडणात कर्मचाऱ्यांनी त्यांना मारहाण केली आणि त्यांचा मोबाईल फोन हिसकावून घेतला.