बीडमध्ये कोचिंग क्लासमध्ये अल्पवयीन मुलीचा छळ केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी राष्ट्रावादी काँग्रेसचे (अजित पवार गट) धनंजय मुंडे आणि शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. याबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर दौंडच्या चिंचोली येथे वारीला निघालेल्या एका अल्पवयीन मुलीवर दोन अज्ञातांना लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तसंच अल्पवयीन मुलीबरोबर असलेल्या महिलांचे दागिनेही लंपास केले. या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आरोपींचा शोध अद्याप लागलेला नाही. याबद्दलही चाकणकर यांनी अधिकची माहिती दिली आहे.