Raj Thackeray-Uddhav Thackeray Rally: हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन शासकीय आदेश रद्द करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयावर जल्लोष करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या वतीने आज विजयी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे दोन दशकानंतर ठाकरे बंधू एकाच मंचावर एकत्र येत आहेत. याच पार्श्वभूमीवर वरळीतील विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक व मनसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. केवळ मराठी जनच नव्हे तर या मेळाव्यात गुजराती भाषिक समर्थकांनी सुद्धा हजेरी लावली आहे. महाराष्ट्रद्रोही असं पाठीवर लिहिलेला एक राक्षस याठिकाणी आणण्यात आला असून त्याला चाबकाने फोडण्याचा अभिनय केला जात आहे. प्रातिनिधिक स्वरूपात ही गुणरत्न सदावर्ते यांच्याविरुद्ध मांडलेली भूमिका असल्याचे सुद्धा कार्यकर्ते सांगतायत.