Dipesh Mhatre Joins BJP In Dombivali: डोंबिवली जिमखाना येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि इतर भाजप नेत्यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांच्या साहाय्याने हा भाजप पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. यापूर्वी ‘मी भाजपमध्ये जाणार नाही. असे काही ठरले नाही,’ असं सांगणारे उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डोंबिवलीचे जिल्हाध्यक्ष दीपेश पुंडलिक म्हात्रे यांनी भाजप प्रवेशाचा आपला निर्णय आपल्या समर्थक कार्यकर्त्यांना शनिवारी रात्री घरगुती प्रीती भोजन कार्यक्रमात सांगितला. आणि कार्यकर्ते, पदाधिकारी यांना सोबत येण्याची गळ घातली. डोंबिवलीत ठाकरे गटाला भगदाड पाडणाऱ्या या निर्णयामागचा घटनाक्रम पाहा..





















