राष्ट्रीय जनता दल पक्षाने बुधवारी रात्री मत चोरीचे नवीन आरोप केले होते, त्यांनी असा दावा केला की, ‘ईव्हीएमने भरलेला एक ट्रक’ मतमोजणी केंद्रात घुसण्याचा प्रयत्न करत होता. या घटनेचा निषेध करण्यासाठी तसंच भारतीय निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण घेण्यासाठी पक्षाचे कार्यकर्तेही या परिसरात जमले होते. याबद्दल जिल्हा दंडाधिकारी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.



















