Ambadas Danve: बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागत आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये एडीएला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसत आहे. भाजपा, जद(यू) आणि लोजप (रामविलास) हे पक्ष एकत्रितपणे १९१ जागांवर आघाडीवर आहेत. तर महागठबंधनला सपशेल अपयश मिळताना दिसत आहे. सुरुवातीच्या या निकालांवर आता अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.



















