ठाकरेंची शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मुंबईतील ताज लँड हॉटेलबाहेर राडा झाल्याचं दिसून आलं. ठाकरेंच्या शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या कामगारांना फसवून भाजप प्रणित संघटनेत घेत असल्याचा आरोप ठाकरेंच्या सेनेकडून करण्यात येत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी शिवसेनेचे नेते अनिल परब दाखल झाल्यानंतर शिवसैनिकांनी गोंधळ घातल्याचं दिसून येतंय.




















