बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत राजधानी पटनाजवळील हाय-प्रोफाइल मोकामा विधानसभा मतदारसंघाने अपेक्षेप्रमाणेच संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. खून, तुरुंगवास आणि त्रिकोणीय लढत अशा नाट्यमय घडामोडींनंतरही बाहुबली नेते आणि जदयूचे उमेदवार अनंत सिंह यांनी मोठी आघाडी घेतली असून, त्यांनी आपली मोकामातील राजकीय पकड पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.




















